धाराशिव:-
इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. तानाजी लाकाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या छायादार व फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.तसेच झाडांच्या संगोपनासाठी डॉ. तानाजी लाकाळ यांनी ट्री गार्ड भेट दिली.
या वेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अभय शहापुरकर, डॉ. दत्तात्रय खुणे ,डॉ. सुधीर मुळे, डॉ.प्रसाद धर्म, डॉ.नितीन भोसले आवर्जून उपस्थित होते. ग्रामस्थ, शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या आवारात हिरवाई निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच गाव हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. लावलेली झाडे जपून ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.