Monday, 18 August 2025

पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:-
इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. तानाजी लाकाळ,  अतिरिक्‍त जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या छायादार व फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.तसेच झाडांच्या संगोपनासाठी डॉ. तानाजी लाकाळ यांनी ट्री गार्ड भेट दिली. 

या वेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अभय शहापुरकर, डॉ. दत्तात्रय खुणे ,डॉ. सुधीर मुळे, डॉ.प्रसाद धर्म, डॉ.नितीन भोसले  आवर्जून  उपस्थित होते. ग्रामस्थ, शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या आवारात हिरवाई निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच गाव हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. लावलेली झाडे जपून ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Thursday, 7 August 2025

धाराशिवमध्ये समाजासाठी प्रेरणादायी पाऊल – दोन मृत व्यक्तींचे यशस्वी देहदान

धाराशिव | ७ ऑगस्ट २०२५:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे आज दोन मृत व्यक्तींच्या देहांचे यशस्वीपणे देहदान करण्यात आले. या समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोलाची मदत होणार असून, इतरांसाठीही एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.

पहिले देहदान कै. श्री. सुभाष काशिनाथ सूर्यवंशी (वय ७५, सोलापूर – सेवानिवृत्त शिक्षक) यांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांनी  नितीन व सऺतोष सूर्यवंशी  यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेञ नानीजधाम ता.जि.रत्नागिरी,  यांच्या प्रेरनेने देहदानाची इच्छा व्यक्त केली.

दुसरे देहदान कै.श्रीमती सिताबाई बापुराव रणदिवे (वय ७०) यांचे करण्यात आले. त्यांचे चुलत नातु दत्ता रणदिवे व उपसरपऺच सतिष खराटे याऺनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून देहदानासाठी पुढाकार घेतला.

या दोन्ही देहांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. शरीररचना विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या कार्यात डॉ. स्वाती पाऺढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचना विभाग), डॉ. सुवर्णा आनंदवाडीकर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. तानाजी लाकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र), श्री. प्रशाऺत बनसोडे, श्री. पंकज कसबे प्रयोगशाळा तऺञज्ञ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेऺद्र चौहान यांचे लाभले. त्यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आणि हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

देहदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून समाजातील इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

पळसप येथे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स तर्फे वृक्षारोपण

धाराशिव:- इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल पेडियाट्रिक्स यांच्या वतीने पळसप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आल...